जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस झाला असून,दोन दिवसापूर्वी मंगळवारी काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली. मात्र, हवामान खात्याकडून जिल्ह्यात आज गुरुवारी पुन्हा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गुरुवारी जिल्ह्यात ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीचा ९५ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या आठवडाभरातच जिल्ह्यात १२५ मिमी पाऊस झाला आहे
पावसाळ्यात जून, जुलै व ऑगस्ट या तिन्ही महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सोमवारी दिवसभर काही अंशी पावसाने दिलासा घेतला होता. तर मंगळवारी सकाळपासून कडक ऊन पडले होते. बुधवारी जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच होती.
मात्र, गुरुवारी जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, ३० व ३१ ऑगस्ट रोजी मात्र पुन्हा पावसापासून काही अंशी दिलासा मिळू शकतो. तर १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. ‘पोळा’ सणादरम्यान देखील जोरदार पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता आहे.