⁠ 
शनिवार, सप्टेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | राज्यात पुढचे चार दिवस कोसळधार ; ‘या’ तारखेपासून जळगावातही बरसणार मुसळधार..

राज्यात पुढचे चार दिवस कोसळधार ; ‘या’ तारखेपासून जळगावातही बरसणार मुसळधार..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२३ । गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागाला पावसाने झोडपून काढलं असून यामुळे जनजीवन विस्कळी झाले आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला असून याच पार्श्वभूमीवर पावसाचा अलर्ट जारी देखील करण्यात आला आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर जळगावात देखील दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जोरदार पाऊस आणि पुराची शक्यता लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतलीये. त्यामुळे शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीये.

जळगावात या तारखेला मुसळधारची शक्यता?
जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसात पावसाने समाधान कारक हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. शनिवारी दिवसभर पावसाच्या सरी कोसळल्या त्यांनतर रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. काल रविवारी झालेल्या पावसाने दाणादाण उडवली. दरम्यान २६ आणि २७ जुलै रोजी जळगाव शहरासह काही तालुक्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर इतर तालुक्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात म्हणजेच जून मध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवात जिल्ह्यात पावसाने हलक्या ते मध्यम प्रमाणात हजेरी लावल्याने काहीसा प्रमाणात पेरण्या. परंतु मध्यंतरी पावसाने दडी मारली होती. मात्र गेल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. यामुळे काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला होता. जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.

जळगांव जिल्हा 24/ 07/2023
अमळनेर-
बोदवड-2
भडगाव-4
भुसावळ-5.2
पाचोरा-5
पारोळा-
जामनेर-5
चोपडा-0
चाळीसगाव-0
रावेर-
मुक्ताईनगर-0
धरणगाव-18
यावल-0
एरंडोल-19
जळगाव-

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.