जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । राज्यात (Maharashtra Rain) मागच्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, कोकण भागात पावसाने कहर केला असून अशातच आता हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे. येत्या 4, 5 दिवस राज्यात मान्सून सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजच्या दिवसासाठी जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. Heavy Rain in Maharashtra
राज्यात सध्या विविध ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. सातारा, सांगली कोल्हापूर, मुंबई यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता हवामान खात्याने (IMD on Maharashtra Rain) आणखी इशारा दिला आहे.या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भ,मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही मुसळधार पावसासाठी लक्ष ठेवावे लागेल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
दरम्यान, सोमवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरु होता, मात्र त्यानंतर काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. आज हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानतंर ८ तारखेसाठी देखीलयलो अलर्ट जारी करण्यात आला असून शुक्रवारपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.