खान्देशात जोरदार पाउस : गावांचा संपर्क तुटला

जुलै 13, 2023 12:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ । संपुर्ण देशात सध्या जोरदार पाउस सुरु झाला आहे. याचा फटका राज्यातील कित्येक जिल्ह्यांना बसला आहे. यातच उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाउस झाल्याने तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात नद्यांना मोठा पुर आला आहे.

RAIN NEWS jpg webp

य़ावेळी तालुक्यातील दोन गावातील घर पाण्याखाली गेली आहेत तर सोरापाडा अलीविहीर, मौलीपाडा, इच्छागव्हाण, सिंगपूर शिर्वे या गावातील संपर्क तुटला आहे.

नंदुरबार जिल्‍ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. तालुक्यातील दोन गावातील घर पाण्याखाली गेली आहेत तर सोरापाडा अलीविहीर, मौलीपाडा, इच्छागव्हाण, सिंगपूर शिर्वे या गावातील संपर्क तुटला आहे.

अनेक भागातील शेतात पाणी शिरले आहे. यामुळे मुसळधार पावसाने शेताला तलावाचे रूप आले आहे. तळोदा तालुक्यातील सोरापाडा गावात पाणी शिरल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहे. बस सेवा बंद आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now