⁠ 
सोमवार, मे 6, 2024

जळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२१ ।  जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून गायब झालेल्या पाऊस पुन्हा परतणार आहे. पुढील तीन दिवस उत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आला आहे. तर जळगाव जिल्ह्यात रविवार आणि साेमवारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने खरिपातील पिके वाढत्या उन्हामुळे काेमेजू लागली आहेत. कमाल तापमान ३३ अंशांपर्यंत वाढले असून, किमान तापमान २४ अंशांवर आहे. पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटकाही वाढला आहे. त्याचा परिणाम खरिपाच्या पिकांवर झालेला आहे. पुरेसा पाऊस नसल्याने वाढीच्या अवस्थेत असलेली पिके काेमेजली आहेत. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात २९ ते ३१ अाॅगस्टदरम्यान दमदार पाऊस हजेरी लावण्याचे संकेत आहेत.

पावसाळा आता संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र, अद्यापही वाघूर, अंजनी या नद्यांना पूर आलेले नाहीत. यंदा त्या एकदाही खळाळून वाहिल्या नाहीत. त्यामुळे चिंता वाढली.