⁠ 
शनिवार, मे 4, 2024

राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? आरोग्यमंत्री टोपे म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । भारतात कोरोनाच्या (Corona) केसेस कमी झाल्यामुळे कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, मागील काही दिवसापासून कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. राज्यात देखील शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाली असल्याचं दिसून आलं. अशातच राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नसल्याचे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले टोपे?
कोरोनाचा आजचा आकडा पाहता 254 नवीन रुग्ण आहेत. रिकव्हरी 98 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यात कोवीडच्या चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नाही. राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार नाही. राज्यात कोरोना रुग्ण वाढत नसून लसीकरणही चांगलं झालंय. राज्यात सध्या 1950 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. हा फार मोठा विषय नाही. सध्या सर्वत्र गर्दी होत असून राजकीय मेळावे होत आहे. तरीही कोरोना रुग्णांची अपेक्षित वाढ नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आणि चौथ्या लाटेचीही शक्यता वाटत नाही.

दरम्यान, भारतात (India) गेल्या 24 तासामध्ये 2,022 नवीन कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 46 जणांचा जीव गेल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली. ही येणारी आकडेवारी धडकी भरवणारी असून परत एकदा सर्तक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध (Restrictions) हटवल्यामुळे लग्न समारंभ धुमधडाक्यात पार पडत आहेत. तसेच मास्क अजिबात वापरले जाते नाहीये. मुलांना शाळेंना सुट्ट्या असल्यामुळे फिरायल्या जाणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. यामुळे कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते आहे.