⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | समतोल प्रकल्पातर्फे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

समतोल प्रकल्पातर्फे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२३ । केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिनानिमित्त जोगलखेडे व वराडसिम (ता. भुसावळ) येथील मुला-मुलींच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत आर. एल. हॉस्पिटल जळगाव यांच्या सहयोगाने आरोग्य तपासणी करण्यात आली.

जोगलखेडे गावात जवळपास संपूर्ण लोकसंख्या आदिवासी भिल्ल समाजाची आहे आणि तेथील आदिवासी मुलांना आरोग्य सुविधांची गावात पुरेशी व्यवस्था नाही तसेच काही विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या आहेत. म्हणून गावात आरोग्य विषयक जागृती व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी या उपक्रमाचे आयोजन जागतिक अदिवासी दिनानिमित्त करण्यात आले.

या शिबिराच्या प्रारंभी जागतिक अदिवासी दिनावर आधारित माहितीपर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांनी भारतमाता आणि इंग्रजांविरोधात आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे बलिदानी वीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. केशवस्मृती प्रतिष्ठानचे प्रवीण नायसे यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी दिनाची व समतोल प्रकल्पाची माहिती देत मार्गदर्शन केले. आर एल हॉस्पिटलचे जनसंपर्क प्रतिनिधी स्वप्नील पालवे यांनी मनोगत व्यक्त केले.

शिबीर उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हून समतोल प्रकल्प प्रमुख राहुल पवार, आर.एल. हॉस्पिटलचे डॉ. अविनाश शिरुडे, वराडसीम ता. भुसावळ येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा जोशी, मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा फेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतोल प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रदीप पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिभा महाजन यांनी केले. समतोल प्रकल्पाचे टीम सदस्य महेंद्र चौधरी, विश्वजित सपकाळे, दीपक पाचपांडे, प्रशांत चौधरी, प्रतिभा महाजन, रविना भगत तसेच वराडसीम गावाचे सामाजिक कार्यकर्ते लखन सजोले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी तिन्ही शाळेच्या एकूण ११० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.