महाराष्ट्र

आईस्क्रीम घेण्यासाठी फ्रिजरपर्यंत गेला : झाला शॉक लागून मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | ३ सप्टेंबर २०२२ | नाशिक येथे मेडिकल स्टोअरमध्ये आईस्क्रीम घेण्यासाठी गेले असता मुलीला इलेक्ट्रिक शॉक लागून तिचा मृत्यू झाला आहे.ग्रीष्मा विकास कुलकर्णी असे मुलीचे नाव आहे. हि सर्व घटना मेडिकल मध्ये असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विशाल कुलकर्णी हे परिवारासोबत नाशिक मधील उंटवाडी येथे राहतात. विशाल यांचा नाशिकमध्ये खाजगी व्यवसाय आहे. गुरुवारी (१ ऑगस्ट) घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसोबत गणपती बाप्पाची आरती केली. यांनतर ग्रीष्माने वडिलांकडे आईस्क्रीम खाण्याचा हट्ट केला. ग्रीष्मा ऐकत नसल्याने अखेर वडील तिला जवळच असलेल्या मेडिकल मध्ये घेऊन गेले. या मेडिकलमध्ये आईस्क्रीमचे मोठे फ्रीज होते. आईस्क्रीम मिळण्याचा आनंद ग्रीष्माला होता.

फ्रीजर मधील विविध फ्लेवरचे आईस्क्रीम मधून फ्लेवर निवडण्यासाठी फ्रीज मध्ये डोकावण्याचा तिने पर्यंत केला. मात्र फ्रीजची उंची तिच्या पेक्षा जास्त असल्याने आईस्क्रीमसाठी तिने पाय फ्रिजरच्या ब्रॅकेट वर ठेवले आणि फ्रिजरच्या वायरचा ब्रकेट मध्ये उतरलेला इलेक्ट्रिक करंट ग्रीष्माला लागला आणि ती जागेवरच कोसळत बेशुद्ध झाली . अखेर ग्रीष्माला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

Related Articles

Back to top button