⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

बिनधास्तपणे वाळूची चोरी करीत होता, मात्र एके दिवशी..

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । ‎अवैधपणे वाळूची चोरटी वाहतूक‎ करणारे ट्रॅक्टर यावल पोलिसांनी‎ पकडले. याप्रकरणी ट्रॅक्टर‎ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल‎ करण्यात आला.‎

यावल-भुसावळ रस्त्यावर यावल‎ पोलिस ठाण्याचे कर्मचारी गस्तीवर‎ होते. निमगावच्या‎ बसस्थानकाजवळ एक विना‎ क्रमांकांचे ट्रॅक्टर दिसले. हे ट्रॅक्टर‎ पोलिसांच्या पथकाने थांबवले.‎ तपासणी अंती त्यात वाळू दिसून‎ आली. तेव्हा ट्रॅक्टर चालक गोकुळ‎ रघुनाथ सपकाळे (रा.भोलाणे‎ ता.जि.जळगाव) यांच्याकडे वाळू‎ कुठून आणली? त्याचा परवाना‎ आहे का? याबाबत विचारणा केली.‎ मात्र, त्याने तो उडवाउडवीची उत्तरे‎ दिली. या ट्रॅक्टरद्वारे विनापरवाना‎ वाळूची चोरी करून वाहतूक होत‎ असल्याची खात्री होताच पोलिसांनी‎ ट्रॅक्टर जप्त केले.

या प्रकरणी यावल‎ पोलिस ठाण्यात गोकुळ रघुनाथ‎ सपकाळे (रा.भोलाणे) याच्या‎ विरोधात गुन्हा दाखल करण्यात‎ आला. तपास पोलिस नाईक किशोर‎ परदेशी करत असल्याची माहिती‎ देण्यात आली.‎