गुन्हेजळगाव जिल्हा
बापरे : धावत्या रेल्वेतून प्रवाशाला फेकले !
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । धावत्या प्रवासी रेल्वे गाडीतून सफाई कर्मचार्याने प्रवाश्याला फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका कर्मचार्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
वाघळी ते कजगावदरम्यान २ रोजी सचखंड एक्सप्रेसमधून एका प्रवाशाला फेकण्यात आल्याची घटना घडली होती. सचखंड एक्सप्रेसच्या एसी कोच बी/३ मधून एक प्रवासी प्रवास करत होता. एक्सप्रेसने चाळीसगाव सोडल्यावर हा प्रवासी बाथरूमसाठी जात होता. वाटेत त्या कोच मधील एका सफाई कामगाराने त्या प्रवाशाला चालत्या गाडीतून ढकलून दिले. ही घटना पाहणार्या प्रवाशाने याची माहिती औरंगाबाद रेल्वे पोलिसांना दिली. त्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली.
चाळीसगाव रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांना कजगावजवळ रेल्वेमार्गाच्या बाजूला झुडपात ५५ ते ६० वर्षे वयाच्या प्रवाशाचा मृतदेह आढळून आला. मृताची ओळख पटलेली नाही. तर दुसरीकडे सदर रेल्वेतील सफाई कर्मचार्याला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.