---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

मंत्रिमंडळात जळगाव मधून यांची आहे प्रबळ दावेदारी; वाचा सविस्तर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । 26 जानेवारी 2023 ।गेल्या काही महिन्यांपासून मंत्री मंडळ विस्तार होण्याच्या चर्चा बंद झाल्या होत्या. मात्र अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली वारी केली. यामुळे आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटातील कोणत्या आमदाराला मंत्री पद मिळणार? याची उत्सुकता संपूर्ण जळगाव जिल्ह्याला लागली आहे.(jalgaon district cabinate ministers)

mantripad jalgaon 1 jpg webp webp

शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक बळ हे जळगाव जिल्ह्यातील आमदारांनी दिल होत. जळगाव जिल्ह्यातील पाचही आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते. जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील, पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि चोपड्याचे आमदार लता सोनावणे यांचा त्यात समावेश होता. यातील गुलाबराव पाटील हे माजी मंत्री असल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. मात्र आता इतर चार आमदारांपैकी नक्की कोणाला मंत्रीपद मिळणार? हे पाहणे संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी उत्सूकतेचे ठरणार आहे.

---Advertisement---

पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे असल्याचे म्हटले जाते. कित्येकदा मुख्यमंत्री शिंदे हे पाचोर्‍याला आले आहेत. त्याचबरोबर पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील हे शिवसेनेचे सर्वात जेष्ठ आमदार असल्याने त्यांनाही मंत्रिपद मिळू शकते असेही म्हटले जात आहे. तर दुसरीकडे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंसोबत केलेल्या संघर्षामुळे त्यांना देखील मंत्री पद मिळेल असे चित्र आहे. मात्र या सगळ्यात नक्की कोणत्या आमदाराला मंत्रीपद मिळेल हे पाहणं अतिशय उत्सुकतेचे ठरणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिला 16 आमदारांपैकी गेलेले जिल्ह्यातील आमदार हे चिमणराव पाटील होते. त्यामुळे त्यांच्या संधी मिळायची अपेक्षा संपूर्ण जळगाव जिल्ह्यात केली जात आहे. मात्र आता नक्की कोण होणार जिल्ह्यातील शिंदे गटाचा दुसरा मंत्री? हे पाहणं अतिशय उत्सुकतेचे ठरणार आहे

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---