⁠ 
सोमवार, जानेवारी 13, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | दारुच्या नशेत मारहाण‎ करुन मित्राला घेतला‎ चावा

दारुच्या नशेत मारहाण‎ करुन मित्राला घेतला‎ चावा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । दारूच्या नशेत युवकाला एका व्यक्तीने‎ लोखंडी वस्तूने मारहाण केली. तसेच त्याच्या मित्राच्या हाताच्या उजच्या अंगठ्याला चावा घेऊन‎ जखमी केल्याची घटना शहरातील शिवाजीनगरातील हुडको भागात घडली आहे. याबाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर‎ हुडको येथे राहणारा रिक्षाचालक‎ युवकाने याबाबत पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार संशयित गोपी उर्फ गोपीमामा धोबी‎ (रा. गीतेश्वर बिल्डिंग,‎ शिवाजीनगर हुडको) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी ३.३५ वाजेच्या‎ सुमारास ही घटना घडली. म्हणजे शहरातील शिवाजीनगरातील हुडको भागात‎ फिर्याद युवक असताना त्याला संशयित गोपी उर्फ गोपीमामा धोबी‎ (रा. गीतेश्वर बिल्डिंग,‎ शिवाजीनगर हुडको) याने‎ लोखंडी वस्तूने मारहाण केली.‎ तसेच त्याच्या मित्राच्या हाताच्या‎ उजव्या अंगठ्याला चावा घेऊन‎ जखमी केले. दोघांनाही शिविगाळ करुन‎ धमकी दिली. या प्रकरणी त्याने शहर‎ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.‎

author avatar
टीम जळगाव लाईव्ह