शनिवार, सप्टेंबर 16, 2023

फोरव्हीलर घेण्यासाठी माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ

जळगाव लाईव्ह न्यूज| ९ ऑगस्ट २०२३। फोरव्हीलर घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले नाही, या कारणावरून विवाहितेला मारहाण करून माहेरी हाकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून ओझर, नाशिक येथील सासरच्या लोकांविरूद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंबरखेड येथील माहेर असलेल्या २६ वर्षीय विवाहितेचा ओझर, नाशिक येथील कुणाल भास्कर कोठावदे याच्याशी फेब्रुवारी २०२२ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर एक महिन्यातच विवाहितेला तू मला आवडत नाही, असे सांगत पतीने त्रास द्यायला सुरूवात केली. तसेच माहेरून फोरव्हीलर घेण्यासाठी पाच लाख रूपये आणले नाही म्हणून शिवीगाळ, मारहाण करून माहेरी पोहचवून दिले.

याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासू, सासरे यांच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.