ट्रॅक्टर घेण्यासाठी विवाहितेचा छळ, पोलिसांत गुन्हा..

ऑक्टोबर 23, 2022 6:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२२ । शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घेण्याकरिता माहेरून दोन लाख रुपये आणावे ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे रवंजे खुर्द येथील माहेरवाशिणीचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी सुनिता दीपक कोळी वय २७ वर्षे या महिलेने एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 2022 06 13T124638.838 jpg webp

आरोपींमध्ये दीपक सुभाष कोळी ( पती ), सुनंदा सुभाष कोळी ( सासू ) रा. साळवा ता. धरणगाव, मंगला मोहन बाविस्कर ( नणंद )रा. बोरगावले ता. चोपडा, आशा शरद सपकाळे ( नणंद ) ह. मु. मुंबई यांचा समावेश आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील व पंकज पाटील, मिलिंद कुमावत, अनिल पाटील हे पुढील तपास करीत आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now