⁠ 
शनिवार, मे 4, 2024

बोदवडच्या रासेयो एककाद्वारे दत्तक ग्राम हिंगणे येथे ‘हर घर तिरंगा’ रॅली!

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२२ । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने बोदवड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने ‘स्वराज्य महोत्सव’ आणि ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत आज जनजागृती फेरी आयोजित करण्यात आली होती. यात नागरिकांना राष्ट्रध्वजाची खरेदी करणे , आपल्या घरावर राष्ट्र ध्वज फडकवणे व ध्वज संहिता याविषयी रॅली मध्ये मार्गदर्शन करण्यात आले. हींगणे जि.प.शाळामधील विध्यार्थी तसेच कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय बोदवड रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी सर्व गावांमध्ये घरोघरी जाऊन ग्रामस्थांना ‘हर घर तिरंगा’ या अभियानाचे महत्त्व पटवून दिले. यानंतर गावामध्ये भारत माता की जय च्या उस्फूर्तपणे घोषणा देत जनजागृती रॅली काढण्यात आली. सदर रॅलीसाठी हिंगणे गावच्या सरपंच मनीषा पाटील, समाजसेवक रामराव पाटील, बोदवड महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी, उपप्राचार्य डॉ. व्ही. पी. चौधरी, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल बारी, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. वंदना बडगुजर, डॉ. माधव वराडे, डॉ. ईश्वर म्हसलेकर तसेच मुख्याध्यापक नितीन भंगाळे, अतुल पाटील सर्व शिक्षक, रासेयो स्वयंसेवक संजय डांगे, ऋषभ बावस्कर, वैभव वाघ, अभिजीत शिंदे, भाग्यता पाटील, अजय डिवरे, ओम पाटिल, दिपक वाणी,गणेश सोनार भाग्यश्री पाटील, भाग्यश्री अशोक बर्डे, रोशनी गजानन बर्डे, अश्विनी समाधान बोरसे, सिद्धी मुकेश शर्मा, साक्षी गजानन शिसोदे, शुभांगी विनोद सिंग सिसोदिया, साक्षी विजय घोरपडे, प्रीती मनोज परदेशी ,नम्रता विठ्ठल चौधरी, शुभांगी शरद फरपळ, पूजा अशोक शेळके, अतुल पाटील, ग्रामसेवक दिलीप सुरवाडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करणे, हे प्रत्येक भारतीयासाठी गर्वाची गोष्ट असून हा महोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा मान राखत ध्वज साहिंतेचे प्रत्येक भारतीयानी तंतोतंत पालन केले पाहिजे. त्या साठी आजच्या जनजागृती फेरीचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते – प्राध्यापक अरविंद चौधरी, प्राचार्य