जळगाव शहरराजकारण

आधी स्वतःचा खोका तपासा : गुलाबराव पाटलांचा खडसेंवर जोरदार हल्लाबोल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२२ । एकनाथराव खडसे आमच्यावर टीका करता आहेत. ज्या पक्षाने तीन वेळा मंत्री केले, विरोधी पक्षनेते केले ते त्यांना झाले नाही. त्यांनी पक्षांतर केले आम्ही तर आजपण शिवसेनेतच आहोत. दूध संघातील तूप ठेवायला जळगावात त्यांना कोल्ड स्टोरेज भेटले नाही ते साताऱ्याला पाठवले. आम्हाला काय खोके-खोके करता अगोदर स्वतःचा खोका त्यांनी तपासावा, असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लगावला आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजेपासून मतदान प्रक्रिया पार पडत असून या निवडणुकीला 441 जण मतदान करणार आहेत. दरम्यान, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापलेलं पाहायला मिळाले. मागच्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे विरूद्ध गिरीष महाजन आणि गुलाबराव पाटील असा वाद होताना दिसत आहे. दरम्यान एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होतेय.

दरम्यान, खडसे यांनी सत्तेचा दुरुपयोग होतो आहे. खोके आले आहे त्यातील काही नोटा बाहेर येऊ शकतात. सत्तेचा उपयोग, धनशक्तीचा वापर केला जाऊ शकतो असे खडसे म्हणाले. खोक्याच्या आरोपावरून गिरीश महाजन यांनी देखील खडसेंवर पलटवार केला.

जळगाव जिल्हा दूध संघात तुम्ही सात वर्षात काय दिवे लावले तूप खाल्लं, लोणी खाल्लं त्यामुळे खडसेंनी पराभवाचे कारण शोधू नये असा पलटवार गिरीश महाजन यांनी खडसेंवर केला. दुसऱ्यावर आरोप करून आपण म्हणता खोके वाटले, पेट्या वाटल्या तुम्ही काय आहात हे लोकांना सगळं माहिती आहे असेही ते म्हणाले होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button