शनिवार, डिसेंबर 2, 2023

मोठी बातमी : अजित पवारांसोबत अनिल भाईदास पाटील घेणार मंत्री पदाची शपथ !

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असलेले एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील हे अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त हाती येत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून एक मोठा राजकीय भूकंप झाला असून आता अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. अजित पवार यांच्यासोबत नऊ मंत्री शपथ घेणार आहेत. ज्यामध्ये अनिल भाईदास पाटील यांच्याही शपथविधी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

जळगाव जिल्ह्यात अनिल भाईदास पाटील हे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार आहेत. अनिल भाईदास पाटील यांच्यासोबत छगन भुजबळ , आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे व दिलीप वळसे पाटील हेदेखील शपथ घेतील असे म्हटले जात आहे.