⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

.. तसं आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत ; ना.गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२२ । यावल (Yawal) तालुक्यातील न्हावी इथं जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा शिंदे गटातील सदस्य तसेच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) यांच्यावर टोला लगावला आहे

काय म्हणले नेमकं?
32 वर्षांचा पोरगा उठतो आणि आमच्यावर टीका करतो. अरे बाबा तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत”, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. अली बाबा और उसके चालीस चोर थे, तसं आम्हीही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत!, असंही ते म्हणालेत.शिवसेनेतून बाहेर पडल्यावर काही लोक म्हणतात की तेरा क्या होगा कालिया? मात्र आहे आमचा गब्बर आहे”, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना उत्तर दिलं.

हे पब्लिक है ये सब जानती है
‘आमदार होण सांध झालं राहिलेले नाही, पहिल्यांदा वेळी कुणीही आमदार होतं, मात्र पुन्हा आमदार होणं कठीण असतं, हे पब्लिक है ये सब जानती आहे, हे लोक आता वेड बनणारं नाही. ज्याप्रमाणे भाजीपाला घेतांना तो निवडून घेतात त्याप्रमाणे पाच वर्षांसाठी आमदार निवडतात. असेही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

“मी गुवाहाटी गेलो. तेव्हा पत्नी-मुलांचे फोन आले की परत या. पण आता परत येत नाही असं मी त्यांना ठणकावून सांगितलं. ज्याप्रमाणे अली बाबा के चालीस चोर थे तसं आम्ही शिंदे बाबा के चालीस आमदार आहोत! या शब्दात इतिहास लिहिला जाईल”, असंही पाटील म्हणालेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. त्यांना सांगितलं की, गेलेल्या आमदारांना परत बोलवा. असं केलं असतं तर सरकार वाचू शकलं असतं. मात्र त्यावेळी त्यांनी उडाले ते कावळे, राहिले ते मावळे अशी भाषा वापरण्यात आली. ते पटणारं नव्हतं, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी नाराजी व्यक्त केली.

संजय राऊतांवरही साधला निशाणा
टीका करणाऱ्यांना आतापर्यत मी बोलत नव्हतो, चुप्पी साधली होती, मात्र ज्याची वार्डात निवडून यायची लायकी नाही तो सुद्धा आम्हाला बोलतोय, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.