राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२३ । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर राज्यातील विरोधकांनी राज्यपालांना तातडीने पदावरून दूर करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. यानंतर कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अखेर मंजूर झाला आहे.

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राज्यातील विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहे. याच दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao aPatil) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील?
राज्यपालपदावरून राजीनामा देण्याची मानसिकता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची होती. राज्यपालांचा कार्यकाळ संपलेला होता. जनतेचा रोष घेण्यापेक्षा राजीनामा दिला आणि त्यांच्याकडून जी चांगली कामं झाली त्याबद्दल त्यांचे मंत्री गुलाबराब पाटील यांनी आभार व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काढले गेले होते, शेवटी हा क्षमा करणारा महाराष्ट्र आहे. येत्या पुढील काळात कोणीही महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह विधानं करू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.