⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

डल्ला जर मारला आहे, तर.. मंत्री गुलाबराव पाटीलांनी रोहित पवारांना डिवचलं

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२४ । राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांची ईडीकडून 12 तास चौकशी करण्यात आली असून त्यांना पुन्हा 1 फेब्रुवारी रोजी चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे रोहित पवारांच्या चौकशीवरून सरकारवर टीका केली जात आहे. या टिकेवरून राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

त्यांनी रोहित पवार यांना डिवचलं आहे. ईडीच्या चौकशीचा आणि सरकारचा काहीच संबंध नाही. या चौकश्या सरकार करत नाही. ईडी ही एक स्वतंत्र एजन्सी आहे. तुम्ही जर निष्कलंक असाल तर काहीच होणार नाही. पण तुम्ही जर कलंकित असाल तर कारवाई होणारच. पण गल्ला जर खाल्ला असेल, डल्ला जर मारला असेल तर निश्चितच चौकशीला सामोरे जावे लागेल. या चौकशीत दूध का दूध आणि पानी का पानी सिद्ध करावं लागेल, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

असं काही करू नका
यावेळी गुलाबराव पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनाही आवाहन केलंय. मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ तुमच्या बाजूने आहेत. त्यामुळे नाहक आपलेच भाऊ अडचणीत येतील. मुंबईत त्रास होईल असं काही करू नका, असं कळकळीचं आवाहन पाटील यांनी केलं.