पालकमंत्री गुलाबराव पाटील कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कातील व्यक्तींना आवाहन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, गेल्या २-३ दिवसात त्यांनी अनेक कार्यक्रमांना आणि बैठकीला हजेरी लावली होती.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः फेसबुकवर याबाबत माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -