⁠ 
बुधवार, मे 8, 2024

गुलाबराव पाटलांना जळगाव जिल्हा न्यायालयाचा दणका ! ‘इतक्या’ रुपयाचा दंड ठोठावला 

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२३ । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.या खटल्याच्या सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मंत्री गुलाबराव पाटील गैरहजर राहिल्याने जळगाव जिल्हा न्यायालयाने त्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता २१ जून रोजी होणार आहे.

दरम्यान, याप्रकरणातील सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून गुलाबराव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. कोर्टाने ५०० रुपयांचा दंड आकारत गुलाबराव पाटलांचा अर्ज मंजूर केला. तसेच रजेचा अर्ज मंजूर करताना, उद्याचा सुनावणीचा दिवस सोडून पुढची तारीख मिळणार नाही, अशी तंबीही कोर्टाने गुलाबराव पाटील यांना दिली. या खटल्याची पुढील सुनावणी आता २१ जून रोजी होणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

युती सरकारमध्ये मंत्री असताना एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री असताना गुलाबराव पाटलांनी त्यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर करून सरकारकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटण्याचा आरोप केला होता. या आरोपासंदर्भात एकनाथ खडसेंनी २०१६ मध्ये गुलाबराव पाटलांच्या विरोधात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.