⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

गुलाबराव पाटलांनी राखला एरंडोलचा गड !

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२३ । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वीस वर्षाची आपली विजयाची परंपरा कायम राखली. एरंडोल येथील एरंडोल तालुका शेतकरी संघाच्या निवडणुकीसाठी दिनांक 21 मे रोजी मतदान होऊन दिनांक 22 मे रोजी सकाळी म्हसावद रस्त्यावरील आयटीआय प्रशिक्षण केंद्रात मतमोजणी झाली दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणूक निर्णयाधिकारी गुलाब पाटील यांनी सर्व जागांचे निकाल घोषित केले.

या निकाला अन्वये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार सहकार पॅनल ला घवघवीत यश मिळाले असून पालकमंत्र्यांनी सत्तेची वीस वर्षाची आपली परंपरा यावेळी देखील कायम राखली आहे. पालकमंत्र्यांच्या पॅनलचे 15 उमेदवार विजयी झाले आहेत याआधी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या पत्नी सोनल संजय पवार व प्रतिभा दिनेश पाटील या दोन महिला, महिला राखीव जागेतून बिनविरोध निवडून आल्या मुळे आता तेरा जागांसाठी निवडणूक झाली .

सर्वसाधारण संस्था मतदार संघाचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे
संजय जाधव, गजानन पाटील, धनराज महाजन, सुमनबाई पाटील, प्रकाश महाजन, पवन सोनवणे, भगवंतराव पाटील तर विजाभ व विमाप्र मधून रवींद्र भगतसिंग पाटील सर्वसाधारण व्यक्तीशः मतदारसंघातून रवींद्र बाबुराव चव्हाण, ज्ञानेश्वर महाजन, विनोद निळकंठ पाटील हे विजयी झाले असून इतर मागास वर्गातून संभाजी शिवाजी चव्हाण तर अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून कल्पना गरीब दास अहिरे या विजयी झाल्या आहेत.

सदर निवडणुकीसाठी खासदार उमेश पाटील, नामदार गिरीश महाजन, आमदार चिमणराव पाटील, आमदार राजू मामा भोळे, भाजपाचे सुभाष पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, पी .सी .पाटील, यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले . निवडणुकीसाठी शेतकरी संघाचे व्यवस्थापक अरुण पाटील, कर्मचारी सागर पाटील, रोहित चौधरी, जगदीश पाटील, राजेंद्र पाटील, उमेश चौधरी, यांनी परिश्रम घेतले.