---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

गुलाबराव पाटलांना दिल्लीहून नोटीस आली म्हणून पळून गेले – संजय सावंत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । गुलाबराव पाटील यांना दिल्लीहून नोटीस आली म्हणून शिंदे गटात पळून गेले अशी टीका शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केली आहे. रे नुकतेच जिल्ह्यातील शिवसैनिकांना सभेत संबोधन करत होते. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत म्हणाले की गुलाबराव पाटील म्हणतात किती हिंदुत्वासाठी शिंदे गटात गेले आहेत. मात्र त्यांना दिल्लीतून नोटीस आली म्हणून गुलाबराव पाटील शिंदे गटात गेले आहेत.

sanjay sawant gulabrao patil

यावेळी सावंत असेही म्हणाले की, नोटीस आल्यानंतर गुलाबराव पाटील माझ्याजवळ आले होते. माझ्याशी बोलताना ते म्हणाले की, मला त्यांच्यासोबत जाव लागेल. मला नोटीस आली आहे. असं म्हणत गुलाबराव पाटील इथून घाबरून पळून गेलेत.

---Advertisement---

तर, संजय राऊत यांच्या बद्दल बोलताना संजय सावंत म्हणाले की, संजय राऊत हे खरे शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर ईडीने खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र ते कोणासमोर झुकले नाहीत गेल्या दोन महिन्यापासून ते जेल मध्ये आहेत. मात्र ते झुकले नाहीत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---