गुलाबराव पाटलांनी बदलला पक्ष : भाजपात प्रवेश?
जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२२ । शिवसेना आमचीच, आम्ही बाळासाहेबांचेच शिवसैनिक असं ठासून सांगणारे राज्याचे कॅबिनेटमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशी माहिती गूगल तर्फे देण्यात येत आहे. विकिपीडियाच्यामते गुलाबराव पाटील आता भाजपचे नेते झाले आहे आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कुणाला कुठलं खाते मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात नव्या मंत्र्यांनी मिळणारी संभाव्य खात्यांचे नाव समोर आले आहे.यात गुलाबराव पाटील यांना पाणीपुरवठा खाते मिळणार असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र गूगलने त्यांचा प्रवेश भाजपमध्ये केला आहे.
जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशी माहिती गुगल देत आहे. मात्र यात काहीही तात्याबा नाही. आपण गुगलवर नेहेमीच काही ना काही शोधत असतो. मात्र गुगल नेहेमीच खर असेल असं नाही. काल महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळाचा विस्तार झाला आहे. शिंदे गटातून शिवसेनेची मुलुख मैदान तोफ समजले जाणारे गुलाबराव पाटील यांच्या कॅबिनेट मंत्री पदाची माळ गळ्यात पडली आहे. गुलाबराव पाटील यांच्या प्रोफाईलमध्ये ते शिवसेना प्रवक्ते असल्याचे सांगतेय. खाली राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी असल्याचे सांगत आहे.पण गुलाबराव पाटील यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी असा असल्याचे दाखवत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.