जळगाव जिल्हाजळगाव शहर
गुलाबराव देवकर यांनी स्वीकारला जे.डी.सी.सी.बँक अध्यक्षपदाचा कार्यभार
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२१ । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड ( दि.३ ) रोजी पार पडली. यावेळी अध्यक्षपदी गुलाबराव देवकर व उपाध्यक्षपदी शामकांत सोनवणे यांची निवड झाली.
यावेळी अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी जेडीसीसी बँकेत येऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज व बँकेचे माजी चेअरमन सहकारमहर्षि प्रल्हादराव पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. बँक इमारतीत असलेल्या पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बँकेच्या अध्यक्ष दालनात येऊन बँकेच्या कामकाजाविषयी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडून आढावा घेतला.
या प्रसंगी बँकेचे माजी संचालक सदस्य प्रशांत चौधरी, राम पवार, विलास पाटील व जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते व बँक पदाधिकारी उपस्थित होते.