गुन्हेजळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील चार गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई ; एसपींनी काढले आदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हेगारांवर एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत कारवाई केली जात आहे. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. याचदरम्यान सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आता चार गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहे.

नशिराबाद आणि धरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख शेख मुश्ताक शेख मुसा कुरेशी (४२), टोळी सदस्य आरिफ शेख तस्लीम खान (२४), असलम खान अयाज खान (३०) सर्व रा. कुरेशी मोहल्ला ही टोळीवर नशिराबाद, एमआयडीसी, जामनेर, भुसावळ बाजारपेठ, धरणगाव, पहूर, चाळीसगाव शहर, नशिराबाद व चाळीसगाव रेल्वे पोलिस ठाण्यात ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.

या सोबतच कासोदा पोलिस ठाण्यात अमीन हुसेन शेख (रा. उत्राण, ता.एरंडोल) याच्याविरुद्ध ४ गुन्हे दाखल असण्यासह दोन प्रतिबंधक कारवायादेखील करण्यात आल्या होत्या. तरीदेखील त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार त्याला देखील जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी दिले.

godavari advt (1)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button