गुलाबराब पाटलांसह इतरांना अटक केल्याशिवाय राहणार नाही
जळगाव व्हेंटिलेटर घोटाळा, न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश !
जळगाव लाईव्ह न्यूज । 6 एप्रिल २०२२ । जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना काळात अनेक महत्वाच्या साहित्याची खरेदी करण्यात आली. साहित्य खरेदीत मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सर्वांनी मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम केले आहे. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यासह इतरांविरुद्ध मी न्यायालयात याचिका दाखल केली असून पालकमंत्र्यांवर आक्षेप घेण्यासाठी राज्यपालांची स्वाक्षरी आणावयास सांगितले आहे. मी राज्यपालांकडे पाठपुरावा केला असून दोषींना अटक केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका तक्रारकर्त्या माधुरी अत्तरदे यांनी ६ एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
जळगाव व्हेंटिलेटर घोटाळा : न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश !
कोरोना काळात शासकीय अधिकारी व इतरांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश भोळे यांनी केला होता. या प्रकरणात कोर्टाने प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या प्रकरणी आज मुख्य तक्रारदार दिनेश भोळे, जि.प.सदस्य माधुरी अत्तरदे यांच्यासह चंद्रशेखर अत्तरदे, शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी दिनेश भोळे यांनी सांगितले कि’ कोरोना काळात औषधी व यंत्र सामग्री फक्त कागदोपत्री होत्या. त्यात वेळोवेळी तक्रारी केल्यानंतर ज्या काही वस्तू खरेदि केल्या होत्या त्या निकषानुसार नहोत्या. याची वस्तुनिष्ठ चौकशी झाली पाहिजे. व संबंधीतांवर कारवाई झाली पाहिजेल. यात मुख्य म्हणजे तत्कालीन जिल्हाशल्यचीकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण, सीईओ बी.एन.पाटील, डॉ.डी.एस. कोठडे,प्रमोद पांढरे,मिलिंद काळे,अक्षय जाखेटे, खुशोमाती नवीनचंद्र पुना यांचा समावेश आहे. या प्रकरणात सुरुवातीला ४४ कोटीचे पुरावे हाती आले आहे मात्र हा घोटाळा २५० ते ३०० कोटींचा घरात असल्याचे श्री.भोळे यांनी यावेळी सांगितले. मी या संदर्भात कोर्टात दावा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक याना देखील तक्रार अर्ज दिला आहे. तक्रारीत आठ लोकांची नावे असल्याचे सांगात या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा व संबंधीतांना अटक करावी असे त्यांनी बोलताना सांगितले.