⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावर मार्गदर्शन

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावर मार्गदर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । एकविसाव्या शतकातील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये शैक्षणिक नियमांमध्ये तसेच प्रशासकीय व्यवस्थांमध्ये अनेक सुधारणा व अमुलाग्र बदल नमूद करण्यात आले आहेत या शतकातील शाश्वत विकास, ध्येय प्राप्त करणे शक्य होईल अशी समर्थ व सशक्त शैक्षणिक व्यवस्था उभारणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये दिनांक २ ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर कार्यशाळा नुकतीच संपन्‍न झाली.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सुहास गाजरे (प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव) हे उपस्थित होते. तसेच त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ.हेमंत इंगळे(अधिष्ठाता) तसेच समन्वयक डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (विभाग प्रमुख आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डाटा सायन्स), डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार), सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समन्वयक डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा यांनी भारताच्या शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवणारे नवीन राजकीय शैक्षणिक धोरण अमलात कसे येणार आहे याबद्दल मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २१ व्या शतकात कसे बदल घडवून आणणार याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच शैक्षणिक धोरणांमुळे शैक्षणिक व्यवस्था व संस्था यांच्याकरिता मूलभूत तत्वे निश्चित करण्यात आली आहे.

व या माध्यमातून जागतिक ज्ञान अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे.त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुहास गाजरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शाळांपासून उच्चशिक्षणापर्यंत सर्व स्तरांवर शिक्षणाचा स्तर उंचावला जाणार आहे, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत शिक्षण व्यवस्थेत विविध सुधारणा केल्या जाणार आहेत.यामध्ये शालेय शिक्षणाच्या प्रारंभिक वर्षापासून मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या बहुआयामी विकासासाठी शिक्षणाची बहुपायरी पद्धती ५+३+३+४ लागू केली जाणार आहे. तसेच ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल साधनांचा वापर वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी हळूहळू होणार असून यासाठी सरकारने विविध समित्या आणि कार्य संघाची स्थापना केली आहे या धोरणाची यशस्वी अंमलबजावणी शिक्षण क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवेल आणि विद्यार्थ्यांना त्याच्या उज्वल भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे.त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी अकॅडमिक ऍटोनॉमी, महाविद्यालयाचे स्तंभ जसे की (अकॅडमी प्रोग्राम, रिसर्च, आऊटरिच व फंडिंग, गव्हर्नन्स) त्यानंतर मल्टी, इंटर व ट्रान्स डिसिप्लिनरी शिक्षण त्याचप्रमाणे मल्टिपल एन्ट्री व एक्झिट तसेच एनईपी २०२० चे क्रेडिट फ्रेम वर्क आणि इंडस्ट्री ५.० याबद्दल सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमादरम्यान व कार्यक्रमानंतर विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी त्यांना प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. वैभव पाटील सर (डीएम कार्डिओलॉजी) यांनी कौतुक केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा पाटील यांनी केले. व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.