जळगाव जिल्हा

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागा मार्फत स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करिअर कट्टा या कार्यक्रमात प्रा. राजेंद्र चिंचोले यांचे दिनांक २२ रोजी स्पर्धा परीक्षा सारथी भाग एक व २३ रोजी स्पर्धा परीक्षा सारथी भाग २ या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वेबिनार झाले. यात महाराष्ट्रातील सुमारे पाच हजार विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची संकल्पना महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची आहे.

प्रा.राजेंद्र चिंचोले यांनी दोन सत्रांमध्ये आयोजित मार्गदर्शन शिबिरात केंद्रीय पातळीवरील केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा बाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच आपल्या आवडीनुसार, क्षमतेनुसार स्पर्धा परीक्षा द्वारे उत्तम, रचनात्मक, सर्वोच्च सृजनशील, दैदिप्यमान करिअरचे यशोशिखर गाठावे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना सातत्याने कष्ट करण्याची तयारी हवी, अपयशाला धाडसाने समोर जाण्याची आणि त्यावर मात करण्याची तयारी हवी, स्वतःवर विश्वास ठेवून या परीक्षा द्याव्यात. स्पर्धा परीक्षा हे साधन असून अधिकारी बनून देशाची सेवा करणे हे साध्य आहे. स्पर्धा परीक्षेत परिश्रम ,सूत्रबद्ध ,शिस्तबद्ध ,सातत्यपूर्ण व नियोजनपूर्वक अभ्यास यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. यासाठी प्रयत्न करावे. जर स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने करिअर करावे असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा.यशवंत शितोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना मेंडटके मॅडम यांनी केले.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button