⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

डॉ.केतकीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

जळगाव लाईव्ह न्यूज| १० ऑगस्ट २०२३। गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि. ९ ऑगस्ट रोजी अनेक वेगवेगळे उपक्रम राबविले गेले. त्यापैकीच एका उपक्रमामध्ये आज १० ऑगस्ट रोजी VBDC (स्वैच्छिक रक्तदान शिबिर) जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कॅम्पसमधील ३० रक्त पिशव्या गोदावरी रुग्णालयातर्फे गोळा करण्यात आल्या आहेत.

18 MH BN NCC चे लेफ्टनन्ट कर्नल पवन कुमार, राजेंद्र राजपुत, सुभेदार मेजर प्रेमसिंग, डॉ. नितीन भारंबे, डॉ. भावेश फालक व रक्तपेढी कर्मचारी, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महविद्यालय या सर्वांनी परिश्रम घेतले व सहकार्य केले.

त्याचप्रमाणे डॉ.केतकीताई पाटील यांचा वाढदिवस पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, या दृष्टीने वृक्षलागवड उपक्रम हाती घेऊन देखील साजरा केला गेला. त्याचसोबत डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात स्वातंत्रदिनापर्यंत रूग्णांची सवलतीच्या दरात एम आर आय, सी.टी स्कॅन, सोनोग्राफी व एक्सरे तपासणी केली जाणार आहे, अशी मोठी घोषणा देखील गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्‍त केली.