Friday, December 9, 2022

विवेकानंद प्राथमिक शाळेत गुढीपाडवा सन साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज। २ एप्रिल २०२२। येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा, वाघ नगर, येथे दि. १ एप्रिल रोजी हिंदू नववर्षाचे औचित्य गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात आला.

- Advertisement -

कार्यक्रमाची सुरुवात गुढी उभारा या स्वागत गीताने विद्यार्थिनींनी नृत्य करून केली. इयत्ता दुसरी वर्गातील अंशिका चव्हाण या विद्यार्थिनीने विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी महीने, येणारे नवीन वर्ष याबद्दल माहिती दिली. गुढीपाडवा या सणाची माहिती त्यामागील उद्देश तसेच त्याचे वैज्ञानिक महत्व, माहिती विद्यार्थ्यांना दिपाली कापडणे दीदी यांनी दिली.

कार्यक्रमावर आधारित गोष्ट विद्यार्थ्यांना रिता पवार यांनी सांगितली. विद्यार्थ्यांकडून नववर्षानिमित्त अभ्यासविषयक संकल्प करून घेण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन दिपाली कापडणे यांनी केले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयिका जयश्री वंडोळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

- Advertisement -
[adinserter block="2"]