जळगाव जिल्हाजळगाव शहर
२ एप्रिलला गुढीपाडवा पहाट संगीत कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२२ । हिंदू नववर्ष निमित्त ०२ एप्रिल रोजी सकाळी ६.०० वाजता गुढी पाडवा पहाट संगीत कार्यक्रमाचे आमदार सुरेश भोळे यांच्या’तर्फे शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ व कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानच्या बाजूला आयोजन करण्यात आले आहे.
चैत्र शुद्ध, प्रतिपदा गुढीपाडवा हिंदू नववर्ष निमित्त भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांच्या वतीने शहर वासियांसाठी दि. ०२ एप्रिल रोजी पाडवा पहाट संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.