जळगाव जिल्हा

नशिराबाद येथे गुढीपाडवा उत्सव साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल परिवारातर्फे गुढी पाडवा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विठ्ठल मंदिरा जवळ प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पालखीचे पूजन गावातील जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, अध्यक्ष जनार्दन माळी, उपाध्यक्ष डॉ. विकास चौधरी, संचालक राजू पाटील, विनायक वाणी, मुख्याध्यापक सी.बी.अहिरे, प्रविण महाजन उपस्थित होते.

त्यानंतर “मी मराठी” या नृत्यावर इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून मराठी नव वर्षाचे जल्लोषात स्वागत केले व पालखी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. या सोहळ्यात प्रभू श्रीरामचंद्र, सितामाता, लक्ष्मण, हनुमान, शिवाजी महाराज, जिजामाता, झाशीची राणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सावता महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांचा सजीव आरास देखावा करण्यात आलेला होता.

कार्यक्रमात विठ्ठल मंदिर ते राम मंदिर पर्यंत वनवासी अवतरातील राम, सीता व लक्ष्मण यांची वेशभूषा दाखविण्यात आली व राम मंदिरात रामाचे अयोध्येत आगमन दाखविण्यात येऊन तिथे प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला व तेथून पुढे विठ्ठल मंदिरापर्यंत रामाचे राज अवतारातील रूप दाखविण्यात आले. तर मिवणुकीत माध्यमिक विभागाचे ढोल, ताशे, लेझीम, काठी फिरवणे, समूह नृत्य यांचे आयोजन करण्यात आलेले होते तसेच विद्यार्थांनी मराठी वेशभूषा परिधान केली होती. कार्यक्रमाचे आयोजन अनिल चौधरी, संगिता जोशी व शिल्पा धर्माधिकारी यांनी केले तर त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button