जळगावात जीएसटी महिला अधिकाऱ्यास असा लावला 25 लाखाचा चुना
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२४ । जळगाव येथे वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी वंदना दादाजी ठमे (57) यांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 25 लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. ही घटना 13 ते 23 डिसेंबर दरम्यान घडली असून, चार जणांनी मिळून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
काय आहे घटनाक्रम
वंदना ठमे यांना प्रविण कुमार, के. सी. सुब्रमण्यम, प्रदीप सांवत व संदीप राव या चार जणांनी संपर्क साधला. त्यांनी ठमे यांच्या कॅनरा बँकेच्या खात्यातून मनी लाँड्रींगचे व्यवहार झाले आहेत, तुम्हाला लवकरच अटक होईल, सीबीआय व सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे, असे सांगून भीती दाखवली. या भीतीदायक संदेशांमुळे ठमे यांनी त्यांच्याकडून 25 लाख रुपये दिले.
फसवणूकीची पद्धत
ठमे यांनी त्यांचे कॅनरा बँकेत खाते नसल्याचे स्पष्ट केल्यावरही, भामट्यांनी त्यांच्या नावाने बनावट खाते उघडले असेल, असा संशय आहे. त्यांनी ठमके यांना व्हाट्सअॅप वर बनावट कागदपत्रे पाठवली, ज्यात इंटरपोलने त्यांच्या विरुद्ध रेड नोटीस बजावली आहे व सीबीआय व सुप्रीम कोर्टाने नोटीस काढली आहे, असे दाखवले.