⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

आनंदाची बातमी : आता बसमध्येही देता येणार तिकिटाचे ‘ऑनलाइन’ पैसे

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । बस मधील कंडक्टरच्या हातात लवकरच अँड्रॉइड तिकीट मशीन येणार आहे. एसटी विभागाला १९८० अँड्रॉइड तिकीट मशिन शुक्रवारी प्राप्त झाले. प्रत्येक वाहकाला पुढील दोन दिवसांत हे मशिन दिले जाणार आहे. किंबहुना, ते वापरण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. प्रवाशांना आता गुगल-पे, फोन- पेद्वारे डिजीटल तिकीट काढता येणार आहे.

दरम्यान, प्रवाशांना मशिनवरील क्यूआर कोडद्वारे मोबाइलवरून ई-तिकीटही काढता येणार आहे. परिणामी कॅशलेससेवेचे प्रमाण वाढून सुट्यापैशांचे वाद थांबतील.असे म्हंटले जात आहे. मशिनसोबत चार्जर, कव्हर असणार आहे. प्रत्येक वाहकाच्या नावावर कायमस्वरुपी ही मशिन असेल. नादुरुस्त अँड्रॉइड ईटीआय मशिन आगारातील सव्र्हस सेंटरमध्ये पाठवल्या जातील.

या मशिन काळजीपूर्वक वापरण्याच्या सूचना वाहकांना दिल्या आहेत. चोरी झाल्यास त्याची जबाबदारी वाहकावर राहणार असल्याची माहिती विभागनियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली. वाहकांना हे अँड्रॉइड मशीन दिले जाणार आहेत. त्यामुळे सुट्या पैशांवरून जे वाद व्हायचे ते आता कमी होण्यास मदत होणे शक्य आहे.