⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | भडगाव | भडगावच्या ग्लोबल स्कूलमध्ये टिळकांना अभिवादन!

भडगावच्या ग्लोबल स्कूलमध्ये टिळकांना अभिवादन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थींनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असे इंग्रजांना आत्मविश्वासाने आणि धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज शनिवारी १६६वी जयंती आहे. लोकमान्य बाळगंगाधर टिळक हे नव्या पिढीला कळावे, या यासाठी त्यांची जयंती असो वा पुण्यतिथी, त्यांच्या जीवन कार्याला उजाळा देणे, समाजचे कर्तव्य आहे. त्याच्या जयंतीनिमित्त भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळेचे मुख्याध्यापक अजबसिहं राजपूत याच्या हस्ते प्रतिमेला माल्यर्पण व पुष्पर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी टिळक यांच्यावर भाषणे दिली. स्वतंत्र लढा, केसरी, मराठा सार्वजनिक उत्सव, शिवजयंती, गणेश उत्सव असे अनेक कार्य त्यांनी केले. नव्या पिढीला याची जाणीव व्हावी, म्हणून ही जयंती साजरी केली जाते. असे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक व शिक्षिका वृंद -मनीषा पाटील, बिलाल शेख,विजय बाविस्कर, मयुरी पाटील, भारती तहसीलदार,प्रियांका पाटील,जयश्री पाटील, प्रेरणा महाजन,दर्शना शार्दूल,दर्शना खैरनार,कल्याणी पाटील, जयश्री तहसीलदार, शुभदा जिवरग शिपाई-वैष्णवी ठाकरे, अनिता पाटील यांनी केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह