टांझानिया देशातून मिळाल्या गिरीश महाजनांना शुभेच्छा !
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२३ । राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांना संपूर्ण राज्यातून शुभेछ्या मिळाल्या. मात्र त्यांच्या एका चाहत्याने त्यांना आफ्रिकेतला टांझानिया देशातून शुभेच्छा दिल्या आहेत.
मूळचा जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथील मयूर गवळी हा तरूण सध्या पूर्व आफ्रिकेतील टांझानिया या देशात व्यवसायानिमित्त स्थायिक झाला आहे. ‘बिझनेस कन्सल्टंट’ म्हणून काम करणार्या गवळी मतदारसंघाचे आमदार गिरीश महाजन यांचा चाहता आहे.
दिनांक १७ मे रोजी गिरीशभाऊंचा वाढदिवस त्याने टांझानियात साजरा केला. यात तेथील ख्यातनाम वकील फोरगेथ मोंगी तसेच त्यांच्या स्थानिक मित्रमंडळाने वाढदिवस साजरा करत भाऊंना शुभेच्छा दिल्यात. यानिमित्त वकील फोरगेथ मोंगी यांनी गिरीशभाऊंना दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडीओ सोशल मीडियात ‘व्हायरल’ झालेला आहे.