---Advertisement---
यावल

चितोडा येथे मतदान प्रक्रिया शांततेत, ९ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्युज | १८ डिसेंबर २०२२ | चितोडा येथील ग्रामपंचायतसाठीचे मतदान आज रविवारी शांततेत पार पडले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत जवळपास ८५ टक्के मतदान झाले आहे. सरपंचासह सदस्य पदासाठी एकूण ९ उमेदवारांचे भवितव्य बंद मतदान पेटीत झाले आहे.

jalgaon election jpg webp

आज जिल्ह्यातील १४० ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. त्यात चितोडा येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.

---Advertisement---

आधीच ७ जागा बिनविरोध झाल्या असून सरपंच पदासाठी एकूण चार उमेदवारांनी अर्ज केला होता. तर दोन सदस्य पदासाठी एकूण ५ उमेदवार रिंगणात होते. यासाठी आज मतदान पार पडले. रिंगणात असलेल्या सरपंचासह सदस्य पदासाठी एकूण ९ उमेदवारांचे भवितव्य बंद मतदान पेटीत झाले आहे. या निवडणुकीचा निकाल दोन दिवसांनी म्हणजेच २० डिसेंबर रोजी जाहीर होईल.

वार्डनिहाय झालेलं मतदान
वार्ड एक मध्ये ३५५ पैकी २८९, वार्ड २ मध्ये ४७३ पैकी ४१६ तसेच ५०९ पैकी ४३७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण १३३७ मतदारांपैकी ११४२ मतदारांनी मतदान केलं.

बिनविरोध झालेले वार्डनिहाय उमेदवार
वार्ड एक मध्ये दोन उमेदवार, दोन मध्ये दोन उमेदवार, तीन मध्ये तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---