जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा भोपळाही फुटू शकला नाहीये. यामुळे जळगाव जिल्ह्यात हा भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का समजला जात आहे. तर दुसरीकडे अपक्षांनी मात्र चार जागा जिंकून सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.
संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे जळगाव जिल्ह्यातही ग्रामपंचायत सरपंचांच्या निवडणुकीचा निकाल मोठ्या उत्साहात पार पडला. जळगाव जिल्ह्यात यावल व चोपडा तालुक्यात १३ ग्रामपंचायतींचे निकाल आज लागणार होते. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा भोपळाही फुटू शकलेला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने चांगले यश प्राप्त केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटामधून ३ जागा निवडून आल्या तर अपक्षांनी तब्बल ४ जागांवर आपली मजल मारली.
दुसरीकडे संपूर्ण राज्याप्रमाणे शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना जिल्ह्यात रंगताना पाहिला मिळाला. या सामन्यांमध्ये कोणीही विजयी झाले नसून दोघेही गटांना ३-३ जागा मिळाल्या आहेत. ग्रामपंचायतची ही निवडणूक जिल्ह्यामध्ये शिंदे गटाची लिटमस टेस्ट म्हणून पाहिली जात होती. या परीक्षेत शिंदे गटाचे ३ तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ३ असे सरपंच निवडून आले आहेत.