---Advertisement---
जळगाव जिल्हा विशेष

ग्रामपंचायत निवडणुकांमुळे एसटी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल; हे आहे कारण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | १७ डिसेंबर २०२२ | जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ अंतर्गत मुदत संपुष्टात येत असलेल्या १४० ग्रामपंचायतींसाठी रविवार दि. १८ रोजी मतदान होत आहे. मतदान प्रकियेसाठी शनिवार दुपारी तालुकास्तरावरून मतदान साहित्य वाटप होऊन नियुक्त अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले. यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस बुक करण्यात आल्या आहेत. यामुळे निवडणुकीचे नियोजन सुरळीत पार पडली असली तरी अनेक मार्गांवरील एसटीच्या फेर्‍या रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

st jpg webp webp

मतदान केंद्रावरील कर्मचार्‍यांना निवडणूक साहित्यासह ने-आण करावी लागते. यासाठी प्रशासनाकडून नेहमीच राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून लालपरीची मागणी केली जाते. त्यानुसार, यंदाही रविवारी होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात लालपरींची बुकिंग करण्यात आली आहे. याचा त्रास सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागला. निवडणूक कामासाठी बसेस बुक झाल्याने अनेक आगारांमधील बहुतांश मार्गांवरील फेर्‍यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. परिणामी प्रवाशांना तासंतास बसची वाट पहावी लागली. बसेस का नाही नाहीत किंवा पुढची बस कधी येईल? याची माहिती योग्य पध्दतीने न दिल्याने प्रवाशांच्या संतापात अजून भर पडली.

---Advertisement---

जिल्ह्यात १४० ग्रा.पं.क्षेत्रात ४५४ प्रभागात १२०८ सदस्य आणि १४० सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. १२०८ सदस्यांसाठी २१७९ उमेदवार तर १४० सरपंचदासाठी ३७६ उमेदवार नशिब अजमावत आहेत. निवडणूक मतदानासाठी ग्रामपंचायत क्षेत्रात ४७९ मतदान केंद्र असून ६५० बॅलट युनिट इव्हीएम आणि ५०० कन्ट्रोल युनिटची तांत्रिक तपासणी करण्यात येवून सिलबंद करण्याची प्रकिया झाली आहे. निवडणूक प्रकियेसाठी मतदान केंद्राध्यक्ष सहायक असे एकूण १५०० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कोरोना व कर्मचारी संपाच्या संकटातून कसेबसे सावरत आता महामंडळाची गाडी रुळावर येतांना दिसत आहे. त्यात आता राज्यातच ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असल्याने महामंडळाची तिजोरी भरणार असली तरी याचे योग्य नियोजन झाले नाही, हेच खरे आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---