शिक्षक पदवीधर मतदानासाठी महापौरांनी बजावला हक्क

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२३ । नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असून जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर जयश्री महाजन यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी उत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यात आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. जळगाव शहरातील आर.आर.महाविद्यालयात महापौर जयश्री महाजन यांनी मतदान करीत आपला हक्क बजावला.