⁠ 
रविवार, मे 19, 2024

पदवीधर मतदारसंघ.. मुक्ताईनगरला सर्वपक्षीय बैठक संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व बैठक मुक्ताईनगर तहसील दार दालनात संपन्न झाली. विद्यापीठ/मंडळ पदवीधर मतदार संघ नाशिक यांचे अर्ज स्वीकृत करण्यासाठी आज पासून ते ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अवधी आहे. त्यात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व इतरत्र विद्यापीठाचे गुण पत्र, ग्रांज्यूवेशन सर्टफिकिट, रहिवाशी पुरावा, मतदान कार्ड आदी या नवीन पदवीधर मतदान संघ २० मुक्ताईनगर पदवीधर नाशिक मतदार संघासाठी स्वीकृत करण्यात येणार आहे.

त्यासाठी निवडणूक विभाग मुक्ताईनगर तहसीलदार श्वेता संचेती यांनी निवडणूक आयोगाने पारित केलेली अनुसूची नियम अटी योग्य पद्धतीने बैठकीत सादर केल्या. तालुक्यातील चारही जिल्हा परिषद गट मध्ये महसूल मंडळ अधिकारी सह निवडणूक विभाग मुक्ताईनगर यांच्याकडे सुद्धा फॉर्म उपलब्ध करण्यात आले आहे. पदवीधर बांधवांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा व नाशिक पदवीदर मतदार संघात अर्ज भरून मतदानाचा अधिकार प्राप्त करून घ्यावा असे आव्हान केले आहे.

बैठकीत सर्व पक्षीय पदाधिकारी डॉ.जगदीश पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यु.डी.पाटील, मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई,भाजपा चे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जवरे,प्रहार अपंग क्रांती सेना अध्यक्ष उत्तम जुंबळे सर्व पक्षांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.