जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२५ । पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर आहे. काहीच दिवसापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15631 पदांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार गृह विभागानं ‘जीआर’काढून 15631 जागांवर पोलीस शिपाई भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयानंतर आता पोलीस शिपाई तसेच कारागृह शिपाई पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे बोलले जात असून तरुणांनीही तयारीला लागावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासन निर्णयात काय म्हटलंय?
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.1 जानेवारी 2024 ते दि 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि शासन निर्णय क्रमांकः पोलीस-1125/प्र.क.173/पोल-5अ, दिनांक 20 ऑगस्ट, 2025 दि.01 जानेवारी 2025 ते दि 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी 15631 पदे भरतीकरीता उपलब्ध होणार आहेत.

पदनाम : रिक्त पदांची संख्या
पोलीस शिपाई : 12399
पोलीस शिपाई चालक : 234
बॅण्डस्मन : 25
सशस्त्र पोलीस शिपाई : 2393
कारागृह शिपाई : 580












