⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | गॅस सिलेंडरवरील सबसिडीबाबत सरकारचा मोठा खुलासा

गॅस सिलेंडरवरील सबसिडीबाबत सरकारचा मोठा खुलासा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । गेल्या काही महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडरचे दर भरमसाठ वाढले आहे. सध्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर १ हजार रुपयावर गेले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली गेली आहे. दरम्यान, एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जात असलयाने दिलासा मिळत होता. मात्र घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान दोन वर्षांपूर्वी बंद करण्यात आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सरकारने जून 2020 पासून गॅस सिलिंडरवरील अनुदान बंद केले आहे. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम सचिव पंकज जैन यांनी खुलासा केला. जून 2020 पासून एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी कोणालाही दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, उज्ज्वला योजनेंतर्गत ज्यांना गॅस सिलिंडर देण्यात आले, त्यांनाच २०० रुपये अनुदान दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, सौदी सीपीमध्ये गेल्या 6 महिन्यांत एलपीजी गॅसच्या किमतीत 43 टक्क्यांनी मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. असे असतानाही भारत सरकार आपल्या देशवासीयांना आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यात केवळ 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एलपीजी गॅस सिलिंडरची सबसिडी न कळवता बंद
2010 मध्ये भारत सरकारने पेट्रोलवर दिलेली सबसिडी रद्द केली होती. यानंतर २०१४ मध्ये डिझेलवरील सबसिडीही संपुष्टात आली. त्यानंतर 2016 मध्ये सरकारने रॉकेलवर (केरोसीन) दिले जाणारे अनुदानही बंद केले. या सर्व प्रकारानंतर २०२० पासून एलपीजी गॅस सिलिंडरवरील सबसिडीही बंद झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनवरील सबसिडी बंद करण्यापूर्वी सरकारने अधिकृत घोषणा केली होती. मात्र, सरकारने एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी संपवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

अर्थमंत्र्यांनी केली ही घोषणा
दरम्यान, 21 मे रोजीच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान देण्याची घोषणा लागू केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची घोषणा करण्याबरोबरच, सीतारामन यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरासाठी 12 गॅस सिलिंडरवर प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. सध्या 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1,003 रुपये आहे. परंतु प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येक सिलिंडरचे बुकिंग झाल्यानंतर सरकार 200 रुपये सबसिडी पाठवेल.

या लोकांनाच अनुदान मिळेल
अशाप्रकारे, त्यांच्यासाठी सिलिंडरची प्रभावी किंमत 803 रुपये होईल. मात्र, उज्ज्वला योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या नऊ कोटी लाभार्थ्यांनाच गॅस सबसिडी मिळणार आहे. उर्वरित 21 कोटींहून अधिक गॅस कनेक्शनधारकांना बाजारभावाने गॅस सिलिंडर खरेदी करावे लागणार आहेत

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.