⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

यावल तालुक्यात शासकीय कार्यालयांवर उधारीच्या प्रभारीराज, विकास कामांचा खेळखंडोबा!

Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील मागील दोन ते तिन वर्षापासुन प्रभारी राज सुरू असल्याने विविध विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे. तालुक्यातील नागरीकांना या उधारीच्या प्रभारीराज पासुन कायमचे मुक्त करण्यातसाठी रावेर यावल मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांनी प्रयत्न करावीत अशी अपेक्षाकृत मागणी यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील यांनी व्यक्त केली.

यावल पंचायत समिती नुतन प्रशासकीय ईमारतीच्या सभागृहात नरेगा संदर्भातील ग्रामरोजगार व ग्रामसेवक आणी सरपंच यांच्या समस्यांवर चर्चा करण्याबाबत आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत संयुक्त आढावा बैठकीत शेखर पाटील हे बोलत होते. यावल तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयावर प्रभारी अधिकारी यांची नेमणुक असल्याने अधिकारी हे पुर्ण वेळ देत नसल्या कारणांने तालुक्यातील विविध शासकीय कामे ही प्रलंबीत असून ग्रामीण पातळीवर याचा मोठा परिणाम जाणवत असल्याचे शेखर पाटील यांनी सांगीतले. आमदार शिरीष चौधरी यांनी तालुक्यात कायमस्वरूपी शासकीय सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणुकी केल्यास तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न व कामे मार्गी लागतील असा विश्वास शेखर पाटील यांनी या बैठकीत व्यक्त केला.

या आढावा बैठकीत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे , प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, यावल तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रूबाब तडवी, ग्रामरोजगार संघटनेचे कार्यध्यक्ष बाळु तायडे यांच्यासह ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक , सरपंच मोठया प्रमाणावर याप्रसंगी उपस्थित होते.