जळगाव जिल्हाजळगाव शहर

शुभवार्ता : मनपाच्या अंदाजपत्रकात यंदाही करवाढ टाळणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । महापालिकेच्या सुधारित व आगामी वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी प्रशासकीय कामाला गती आली आहे. बुधवारपासून पालिकेत विभाग प्रमुखांच्या बैठकांचा सपाटा सुरू हाेणार आहे. गेल्या पाच वर्षांप्रमाणे यंदाही करात वाढ करण्यात येणार नाही. त्यामुळे २० फेब्रुवारीला अंदाजपत्रक सादर करण्याचा मुहूर्त टाळण्यात येणार आहे.

महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी २० फेब्रुवारी ही अंतिम तारीख असते. दरवर्षी २० फेब्रुवारीपर्यंत प्रशासनाने तयार केलेले अंदाजपत्रक महापालिका आयुक्त हे स्थायी समितीत सादर करतात. स्थायी समिती सादर केलेल्या अंदाजपत्रकाचा अभ्यास करून नवीन सूचना करण्यासाठी सभा तहकूब करून पुन्हा आठवडाभरात सभेचे आयाेजन करीत असतात; परंतु पालिकेच्या इतिहासात प्रथमच गेल्या सहा महिन्यांपासून पालिकेत स्थायी समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे प्रशासनाने तयार केलेले अंदाजपत्रक महासभेत सादर केले जाणार आहे. यासाठी मुख्य लेखाधिकारी कपिल पवार यांनी मंगळवारी दुपारी आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली. त्यात विभागांकडून आलेल्या जमा-खर्चाच्या माहितीनुसार सूक्ष्म अभ्यासासाठी बुधवारपासून बैठकांचे आयाेजन करण्यात येणार आहे.

येत्या आठवडाभरात अंदाजपत्रक अंतिम केले जाईल. यंदाही प्रशासनाकडून काेणतीही करवाढ न करता जळगावकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे देखील वाचा :

    Related Articles

    Back to top button