दिलासादायक बातमी ! आता प्रीपेड प्लान्समध्ये २८ दिवसांऐवजी ३० दिवसांची वैधता
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । प्रीपेड सेवा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) एक आदेश जारी केला आहे. त्यात टेलिकॉम कंपन्यांना एका महिन्याच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये २८ दिवसांऐवजी ३० दिवसांची वैधता देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, ६० दिवसांच्या आत हे प्लान्स सादर करण्यास सांगितले आहे.
TRAI ने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांकडे किमान एक प्लान व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो (कॉल आणि डेटा) व्हाउचर असणे आवश्यक आहे, ज्याची वैधता 30 दिवस असेल. दूरसंचार कंपन्यांना हा आदेश जारी झाल्यापासून ६० दिवसांच्या आत यावर आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कमी दिवसांची वैधता देत असल्याचा आरोप
खासगी टेलिकॉम कंपन्या जसे की Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea (Vi) या एका महिन्याच्या रिचार्जच्या नावाखाली ३० ऐवजी २८ दिवसांची वैधता ऑफर करतात. ग्राहकांच्या मते कंपन्या दरमहिन्याला २ दिवस कपात करून वर्षभरात २८ दिवस वाचवतात. यामुळे वर्षभरात १२ ऐवजी १३ महिन्यांचे रिचार्ज करावे लागते. याच प्रमाणे दोन महिन्यांच्या रिचार्जमध्ये ५४ किंवा ५६ आणि तीन महिन्यांच्या रिचार्जमध्ये ९० दिवसांऐवजी ८४ दिवसांची वैधता मिळते.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- BRO Bharti : सीमा रस्ते संघटनेत 10 पाससाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 411 पदांसाठी भरती
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते