---Advertisement---
कृषी बाजारभाव महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : शासनाकडून हरभऱ्याला मिळतोय तब्बल ‘इतका’ भाव

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : १२ मार्च २०२३ : शासनातर्फे शासकीय खरदा केंद्रावर हरभऱ्याच्या खरेदीला सुरुवात करण्यात येणार आहे. यंदा शासनाने हरभऱ्याचा हमीभाव ५ हजार ३३५ पर्यंत निश्चित केला आहे.

harbara jpg webp webp

तर दुसरीकडे खासगी बाजारात मात्र हरभऱ्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकन्यांचा शासकीय खरेदी केंद्रावरच विक्रीचा भर दिसून येत आहे. जिल्ह्यात १५ मार्चपर्यंत शासकीय खरेदी केंद्रावर नोंदणी प्रक्रिया सुरू असून, जिल्ह्यातील खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या अक्षरश: रांगा लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील १७ खरेदी केंद्रावर यंदा हरभरा खरेदी करण्यात येणार आहे.

---Advertisement---

जिल्ह्यात यंदा १० हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड झाली आहे. त्यातच भाव देखील चांगला मिळाल्याने हरभरा उत्पादक शेतकरी आनंदात आहेत. तसेच शासकीय खरेदीदेखील लवकरच सुरू होणार असल्याने खरिपातील नुकसानीची भर रब्बीमध्ये तरी निघेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत

खासगी बाजारात हरभयाला ४५०० ते ४८०० रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. शासनाने निश्चित केलेल्या हमीभावापेक्षा हा दर कमी असल्याने खासगी बाजारात शेतकरी आपला माल विक्री करताना दिसून येत नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---