कृषीजळगाव जिल्हा

आनंदाची बातमी : या कारणामुळे शेतकऱ्यांना मिळणार फळ पिक विम्याचा लाभ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२३ । जानेवारी महिन्याच्या सुरवातीला सलग ३ दिवस ८ डिग्री कमी तापमानामुळे शेतकऱ्यांना फळ पिक विम्याचा प्रति हेक्टर रु.२६,५००/- इतका लाभ मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

पुर्नरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ (आंबिया बहार) अंतर्गत दि.१३ जानेवारी २०२३ पर्यंतच्या महावेध माहिती (डेटा) नुसार जळगांव जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळात सलग ३ दिवस किमान तापमान ८ डिग्री सेल्सियस व त्यापेक्षा कमी राहिल्याने; जिल्ह्यातील केळीला तापमानाचा फटका बसून असेन शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. सदर शेतकऱ्यांना रु.२६,५००/- प्रमाणे नुकसान भरपाई मंजुर होणार आहे. अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

पुर्नरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ (आंबिया बहार) अंतर्गत दि.१३ जानेवारी २०२३ पर्यंत कमी तापमानामुळे झालेल्या नुकसान भरपाईस पात्र जळगांव जिह्यातील तालुका व महसूल मंडळे खालील प्रमाणे.

रावेर लोकसभा क्षेत्र

१. भुसावळ : पिंपळगांव
२. बोदवड : बोदवड, करंजी, नाडगांव
३. चोपडा : अडावद, चोपडा, धानोरा, गोरगावले, हातेड
४. जामनेर : जामनेर, मालदाभाडी, नेरी
५. मुक्ताईनगर : अंतुर्ली, घोडसगांव, कुऱ्हा
६. रावेर : खानापूर, खिर्डी, खिरोदा, निंभोरा, रावेर, सावदा
७. यावल : बामणोद, भालोद, फैजपूर, किनगांव, साखळी, यावल

जळगांव लोकसभा क्षेत्र

१. अमळनेर : अमळगाव, अमळनेर, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरुड
२. भडगाव : आमडदे, भडगाव, कजगांव, कोळगाव.
३. चाळीसगाव : बहाळ
४. धरणगाव : चांदसर, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद
५. एरंडोल : उत्रान
६. जळगाव : भोकर, म्हसावद, नशिराबाद, पिंप्राळा

Related Articles

Back to top button